गुजरातमध्ये, साेशल मीडिया आणि माेबाइल फाेनच्या अतिव्यसनामुळे एका 16 वर्षीय मुलीचे वर्तन इतके हिंसक झाले आहे की, तिच्या पालकांनी तिच्यावर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी 4 बाऊन्सर नेमले आहेत. जेव्हा तिला फाेन काॅल नाकारला जाताे, तेव्हा ती अत्यंत आक्रमक हाेते, त्यामुळे तिचे कुटुंब तिच्या सुरक्षेसाठी आणि शिस्तीसाठी दरमहा सुमारे 65,000 रुपये खर्च करत आहे.वैद्यकीय अहवालानुसार, त्या किशाेरवयीन मुलीला अनाेळखी लाेकांशी बाेलण्याचे आणि साेशल मीडियावर फाेटाे शेअर करण्याचे इतके व्यसन लागले हाेते की, ती गुपचूप घरातून बाहेर पडू लागली हाेती. जेव्हा तिच्या पालकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने घरात नासधूस केली आमिहागडी घरगुती उपकरणे व एक टीव्ही ताेडला. तिने एका उंच इमारतीवरून मायक्राेवेव्ह ओव्हन फेकला, तेव्हा तिने संयमाची मर्यादा ओलांडली हाेती. तिला थांबवायला गेलेल्या तिच्या आईवरही तिने हिंसक हल्ला केला. सध्या, हे 4 बाऊन्सर दाेन शिफ्टमध्ये सतत तिच्यावर पहारा देत असतात, जेणेकरून ती तिचा माेबाइल वापरू शकणार नाही.मानसाेपचार तज्ज्ञांच्या मते, काेराेना काळानंतर मुलांमध्ये वाढलेली स्क्रीनच्या व्यसनाची समस्या आता गंभीर मानसिक व वर्तणुकीच्या विकारांचे रूप घेत आहे.