ओशाे - गीता-दर्शन

    12-May-2026
Total Views |
 

osho 
जेव्हा प्रमाण बिघडतं तेव्हा धाेका काय असताे? बिघडलेलं प्रमाण अतिरेकाकडे नेतं. जर तुम्ही मुलांना कमी झाेपू दिले, जबरदस्तीने उठवले तर त्याची प्रतिक्रिया उलटी हाेईल आणि ते जास्त झाेपून त्याचा बराेबर बदला घेतील. आणि मग त्यांची सगळीच प्रमाणे असंतुलित हाेऊन जातील.तुम्ही जिंकले तर ते कमी झाेपत जातील, त्यांनी जिंकले तर ते जास्त झाेपत जातील. पण काही झाले तरी झाेपेचे प्रमाण बिघडून जाईल. जर आई बापांचा जाेर झाला ते जुन्या साच्याचे ठरले तर ते मुलाला कमी झाेपायला लावतील आणि मुलगा नव्या पिढीचा, नव्या दमाचा, उपद्रवी, बंडखाेर ठरला तर ताे जास्त झाेपायचे चालू करील. दाेघांपैकी काेणीही जिंकाे, एक गाेष्ट निश्चित हाेईल- प्रकृतीचा पराभव हाेईल, आणि जे जे प्रमाण आहे ते नित्याचेच बिघडून जाईल.म्हाताऱ्यांचा मृत्यू जवळ येताे तसतशी त्यांना तीन-चार तासांपेक्षा जास्त झाेपेची गरज पडत नाही.
 
कारण शरीरात आता निर्माण काेणी व्हायचे नसते, आता शरीर विसर्जित व्हायची तयारी करत असते. आता झाेपेची फारशी गरज नाही. झाेप हे निर्माणशील तत्त्व आहे. जाेवर शरीरात काही नवे बनत असते ताेवरच झाेपेची गरज असते. जेव्हा नवीन तयार हाेणे बंद झालेले असते. तेव्हा म्हाताऱ्या माणसांना, खरे सांगायचे तर झाेप येतच नसते. मुलेच फक्त खऱ्या अर्थाने झाेपतात, म्हातारी माणसं फक्त थकून विश्राम करीत असतात. कारण आता मृत्यू जवळ येत चाललेला असताे.जगात सगळीकडेच शिक्षक अन् शिक्षक म्हातारे असणार हे ओघानेच येते. सांगत सुटतात- चार वाजले उठा, तीन वाजले उठा, मग माेठी अडचण हाेते. म्हातारी माणसं शिक्षक असतात मग ते मुलांना टाळता येत नसते. पण प्रमाण मात्र बिघडून जातेच.जेवणाच्याही बाबतीत असेच हाेते. लहान मुलांचे जेवण किती असावे आपण त्यांच्या प्रकृतीवर साेपवीत नसताे.त्यांनी किती खायचे हे आई आपल्या आग्रहाने ठरवते.