नागरिकांनी जनगणनेच्या देशव्यापी स्वगणना माेहिमेत सहभागी व्हावे : मुख्य सचिवांचे आवाहन

    12-May-2026
Total Views |
 

janganana 
 
जनगणनेच्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आपली माहिती संगणकाद्वारे एसई पाेर्टलवर नाेंदवली.राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती जनगणनेच्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत एसई पाेर्टलवर नाेंदवून जनगणनेच्या देशव्यापी स्व-गणना प्रक्रियेत सहभागी हाेण्याचे आवाहन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डाॅ. निरुपमा जे. डांगे, तसेच जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संताेष पायस यांनी मुख्य सचिवांना स्मृतिचिन्ह दिले. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डाॅ.श्रीकर परदेशी यांनाही डाॅ. डांगे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले. भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच देशातील प्रत्येक व्यक्तीला स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यासाठी ही स्व-गणना (एसई) पाेर्टल 15 मेपर्यंत कार्यरत राहील. राज्यातील प्रत्येक व्यक्तीने माेठ्या संख्येने ‘स्व-गणना’ सुविधेचा पर्याय निवडावा. जेणेकरून कुटुंबाची नाेंद अचूकता आणि कार्यक्षमतेने हाेईल, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.