प्राेटीन विराेधाभास : ओव्हरडाेजचा छुपा धाेका

    12-May-2026
Total Views |
 

Health 
तथापि, आता तज्ज्ञांनी प्रथिनांच्या अतिसेवनाबाबत धाेक्याची घंटा वाजवली आहे. त्यांनी असा इशारा दिला आहे की, प्रथिनांचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास फायद्याऐवजी नुकसान जास्त हाेऊ शकते.यामुळे किडनीच्या समस्या, जळजळ (इन्फ्लेमेशन) आणि आराेग्याशी संबंधित इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.म्हणूनच आहारतज्ज्ञ आता केवळ प्राेटीनला प्राधान्य देण्याऐवजी संतुलित आहाराचे महत्त्व सांगत आहेत, ज्यामध्ये सर्व पाेषक तत्वे याेग्य प्रमाणात असतील.प्रथिनांच्या अतिसेवनाचे धाेके नुकत्याच झालेल्या एका वैद्यकीय सेमिनारमध्ये तज्ज्ञांनी वाढत्या मप्राेटीन कल्चरफवर चर्चा केली.
 
हा कल विशेषतः तरुणांमध्ये जास्त दिसून येत आहे. अनेक तरुण फिटनेसच्या चुकीच्या माहितीला बळी पडून, त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार आवश्यक असलेल्या 60 ते 80 ग्रॅम प्रथिनांऐवजी दरराेज सुमारे 125 ग्रॅमपर्यंत प्रथिनांचे सेवन करत आहेत. प्रथिनांचे हे अतिरिक्त प्रमाण, विशेषतः जेव्हा ते प्राण्यांपासून मिळणाऱ्या (ऍनिमल बेस्ड)स्त्राेतांतून येते, तेव्हा किडनीचे विकार, शरीराला सूज येणे आणि ऑटाेइम्यून विकारांना निमंत्रण देते.प्राणीजन्य प्रथिनांमुळे चरबी आणि काेलेस्ट्राॅलचे प्रमाण वाढून हृदयविकार तसेच मएथेराेस्क्लेराेसिसफचा धाेका निर्माण हाेताे. शरीरासाठी प्रथिने आवश्यक असली तरी त्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे.म्हणून हाय-प्राेटीन डाएटवर विसंबून राहण्याऐवजी, तज्ज्ञ वनस्पतीजन्य (प्लांट- बेस्ड) प्रथिनांचे विविध प्रकार आहारात समाविष्ट करण्याची शिफारस करतात. हे स्त्राेत अतिरिक्त चरबीशिवाय आवश्यक पाेषक तत्वे प्रदान करतात.
 
प्रथिनांच्या अतिसेवनाचा गैरसमज दूर करा : लाेकांमध्ये असा समज दृढ झाला आहे की, उच्च प्रथिनयुक्त आहारामुळे दीर्घकाळात वजन कमी हाेते आणि फिटनेस वाढताे. मात्र, संशाेधन याच्या उलट सांगते. प्रथिनांचे अतिसेवन केल्याने वजन कमी हाेते किंवा चयापचय आराेग्य सुधारते, याला काेणताही ठाेस वैज्ञानिक पुरावा नाही. उलट, प्रथिनांच्या अतिसेवनामुळे हाडांचे आराेग्य आणि किडनीवर विपरीत परिणाम झाल्याचे पुरावे आढळले आहेत.म्हणूनच, केवळ प्रथिनांचे सेवन वाढवण्यावर भर देण्याऐवजी तज्ज्ञ संतुलित आहाराचा सल्ला देतात. हे साध्य करण्याचा एक साेपा मार्ग म्हणजे धान्य आणि कडधान्ये यांचे तीनास एक या प्रमाणात सेवन करणे. यामुळे शरीराला आवश्यक अमिनाे सिड्सचा पूर्ण संच मिळेल आणि किडनी किंवा पचनसंस्थेवर ताण न पडता आराेग्य सुधारेल.