श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेश मंदिराशेजारील जागेत साकारण्यात येणाऱ्या ‘जय गणेश सेवालयाचे’ भूमिपूजन नुकतेच पार पडले. सेवालयाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या लाखाे गणेश भक्तांसाठी ट्रस्टच्या वतीने विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमाेल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. जय गणेश सेवालयात भाविकांसाठी स्वच्छतागृह, लहान मुले व मातांच्या साेयीसाठी स्तनपान केंद्र, लगेज काऊंटर, चप्पल स्टॅन्ड, सुरक्षा केंद्र, माेबाइल डिपाॅझिटी काउंटर, प्रशासकीय कार्यालय, इन्फाॅर्मेशन सेंटर, प्रथमाेपचार सुविधा आदी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सेवालयाचे काम पुढील अल्प कालावधीत पूर्ण करण्याचा संकल्प असून, हे सेवालय पाच मजली असणार आहे, अशी माहिती सुनील रासने यांनी दिली.