राज्यातील शेतकरी दर्जेदार फळे, भाजीपाला, तसेच इतर शेतमालाचे उत्पादन करतात. मात्र, काही ठिकाणी फळांची गाेडी वाढवण्यासाठी, कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी किंवा अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त हाेत आहेत. अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्या, तसेच थेट पणन व्यवस्थेद्वारे हाेणाऱ्या ेतमाल खरेदी-विक्रीत भेसळ आणि घातक रासायनिक प्रक्रियांना आळा घालण्यासाठी शासनाने कठाेर पावले उचलली आहेत.त्यानुसार पणन संचालनालयाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. फळे कृत्रिमरित्या पिकवणे, त्यांची गाेडी वाढवण्यासाठी रसायनांचा वापर करणे, फळे व भाजीपाल्यांना कृत्रिम रंग देणे, तसेच अन्नधान्य अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केल्याच्या तक्रारी प्राप्त हाेत आहेत. अशा प्रकारांना प्रतिबंधासाठी बाजार समित्यांनी नियमित तपासण्या करून कठाेर उपाययाेजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.