चंद्रपूर जिल्ह्यात काेळशाच्या ओव्हरलाेड वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणविषयक समस्यांवर पर्यावरण, खनिकर्म, परिवहन व स्थानिक प्रशासनाने सूचवलेल्या सूचनांची वेस्टर्न काेलफिल्ड्स लिमिटेडने कंपनीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. स्थानिक नागरिकांचे आराेग्य लक्षात घेऊन वेस्टर्न काेलफिल्ड्सने आपल्या कार्यपद्धतीत तातडीने बदल करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यातील काेळसा उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रणासाठी उपाययाेजना करण्याबाबत आयाेजित बैठकीत देसाई बाेलत हाेते.