जगातील सर्वांत माेठा आउटडाेअर एस्केलेटर, एक किमी लांबी

    12-May-2026
Total Views |
 

china 
 
चीनच्या वुशान शहरामध्ये जगातील सर्वांर्त लांब आउटडाेअर ‘गाॅडेस एस्केलेटर’ (सरकता जिना) सिस्टीम सुरू झाली आहे. सुमारे एक किमी लांबीचा हा एस्केलेटर 242 मीटर उंचीच्या टेकडीपर्यंत जाताे. ही उंची सुमारे 80 मजली इमारती बराेबर आहे. पूर्वी लाेकांना एक तासापर्यंत चढाई करावी लागत असे. आता हा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण हाेत आहे. या एस्केलेटरने चीनच्याच ‘क्राउन एस्केलेटर’चे रेकाॅर्ड माेडले आहे, जाे 112 मीटर लांबीचा आणि 52 मीटर उंचीपर्यंत जात हाेता. पूर्वी जगातील हा सर्वांत जास्त लांबीचा सिंगल एस्केलेटर मानला जात हाेता.21 एस्केलेटर, 8 लिफ्ट कने्नट आहेत
 
 21 एस्केलेटर, 8 लिफ्ट, 4 मूव्हिंग वाॅकवे आणि ब्रिज यांचे पूर्ण नेटवर्क किंवा ट्रान्सपाेर्ट सिस्टीम आहे ‘गाॅडेस एस्केलेटर.’
 माउंटेन-हंगिंग डिझाइनपासून तयार झाला आहे. टेकडी खाेदण्यापेक्षा उतारावर ग्लास स्ट्र्नचर बनविले.
 190 काेटी रुपये खर्चून 4 वर्षांत तयार झाला हा एस्केलेटर. प्रति व्य्नती भाडे 40 रुपये पर्यंत ठेवले आहे.
 वुशान आता गाॅडेस एस्केलेटरसाठी प्रसिद्ध आहे. इथे डिसेंबर 2025 मध्ये 47 लाख टुरिस्ट आले हाेते. जे मागील वर्षीपेक्षा 13% जास्त आहेत.