3. स्त्री - स्त्रीच्या जीवनात रजाेदर्शनाला, मासिक पाळीला ार महत्त्व आहे; नव्हे तिच्या स्त्रीत्वाचेच ते प्रतीक आहे. या प्रक्रियेमुळेच ती ‘म ाता’ हाेऊ शकते. दर महिन्यात येणाऱ्या पाळीमुळे (रजाेदर्शनानंतर) स्त्री तेजस्वी दिसते. यासाठी ज्या अंत:स्रावीग्रंथी ((Harmones) कारणीभूत असतात त्या सक्रिय ठेवण्यासाठी स्त्रीने कार्यरत राहणे, घरकाम, याेगाभ्यास करणे गरजेचे आहे.
4. नदी - पाणी हे नदीचे (आणि सर्वांसाठी) जीवन आहे.
अणि वेग ही तिची शक्ती आहे. नदीला वेग नसेल तर तिचे पाणी गढूळ बनते. साचलेल्या (डबक्यात) पाण्यात तर घाणीचेच साम्राज्य असते. नदीला वेग असेल, ती प्रवाही असेल, तर पाण्यातील घाण, कचरा वाहून जाईल आणि पाणी स्वच्छ, शुद्ध बनेल. म्हणूनच महानदी गंगेचे पाणी ‘अमृत’ समजले जाते, पवित्र समजले जाते. तना-मनाची, शवाची अशुद्धी घालवणारे म्हणून ते मान्यता पावले आहे.
बाेध : ‘थांबला ताे संपला’, या उक्तीप्रमाणे सतत कार्यरत असणे, ‘Active’ राहण्यानेच कुठलीही गाेष्ट चांगली (प्रवाही, सुरू) राहते. मग ताे धातू असाे, एखादा अवयव असाे, जलप्रवाहादी पंचमहाभूते असाेत की माणूस असाे! ‘टेनिसन’ त्याच्या ‘युलिसेस’मध्ये म्हणताे, ’'How dull it is to pause; to make an end, To rust unburnished, not to shine in use!'