टेक वारीमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाला नवी दिशा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    12-May-2026
Total Views |
 
 

bharat 
 
विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकारण्यासाठी प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असून, ‘टेक वारी 2.0’च्या माध्यमातून राज्य प्रशासनाला नवी दिशा देण्याचे कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘टेक वारी 2.0 महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहां’तर्गत महासाधना सप्ताहातील विशेष पारिताेषिक वितरण समारंभात बावनकुळे बाेलत हाेते. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, काैशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लाेढा, सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य अतिरिक्त सचिव व्ही. राधा, तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित हाेते. अ‍ॅड. शेलार यांनी ‘टेक वारी’ची तुलना पंढरपूरच्या वारीशी केली. वारीमध्ये जशी शिस्त, सातत्य, अध्यात्म आणि सामूहिकता आहे, त्याचप्रमाणे प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित हाेणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील खरी साक्षरता बनली असून, प्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. ‘टेक वारी’मुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी बनत असल्याचे लाेढा यांनी सांगितले.