एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली कार्यान्वित करा : नितेश राणे

    11-May-2026
Total Views |
 
 

rane 
 
मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी आधुनिक आणि एकात्मिक ऑनलाईन तिकीट वितरण व विक्री प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जलवाहतूक सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रवासीकेंद्रित करण्यासाठी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह बंदरे, परिवहन व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.मुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीत डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिकीट प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी, यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याने याबाबत आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. जलवाहतूक सेवा ही भविष्यातील सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून विकसित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याने या नव्या सुविधेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार माेहीम राबवावी, अशा सूचना राणे यांनी दिल्या.