किशाेरवयात (टीनएज) मुलांचे प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलतात. ही एक खूपच संवेदनशील अवस्था आहे, जिच्यात मुलांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनात्मक परिवर्तन खूप वेगाने हाेते. तंत्रज्ञान सुलभतेने उपलब्ध असल्यामुळे आभासी आणि प्रत्यक्षातील जग यातील फरक समजण्यास ती असमर्थ असतात. किशाेरवयीन मुलांसाठी (टीनएजर्स) स्वत:पेक्षा जास्त महत्त्वाचा त्यांचा माेबाइल आणि त्यांचे मित्र असतात. अशावेळी आई-वडिलांनी किशाेरवयीन मुलांचे मित्र हाेऊन, त्यांच्याजवळ जाऊन, त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करावी. पुढे काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, ज्यामुळे किशाेरवयीनांचे संगाेपन करण्यात मदत मिळू शकते.
1) विश्वास द्या किशाेरांना विश्वास द्यावा लागेल की, तुमचे बाेलणे हवेतील नाही, तर प्रामाणिक आहे. मुलांशी काेणत्याही विषयावर बाेलण्याच्या आधी पूर्ण माहिती घ्या. पूर्ण इमानदारीने आपले म्हणणे आपली वस्तुस्थिती त्यांच्यासमाेर ठेवा. त्यामुळे त्यांना विश्वास वाटेल की, तुम्हाला आजच्या काळातील सर्व माहिती आहे. अशा वेळी ते सुद्धा आपले म्हणणे तुमच्याशी शेअर करतील आणि तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील.
2) मुलांचे बाेलणे ऐका पालक असल्यामुळे आपल्या मुलांना सल्ला देणे, त्यांना पावलापावलावर अडविणे, थांबविणे ही आपली सवय असते. याच्या ऐवजी कमी बाेला आणि त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. अशा वेळी किशाेरवयीन मुले एखादी समस्या आल्यास तुमच्याजवळ येऊन आपला गाेंधळ सांगतील.त्यानंतर तुम्ही त्यांची प्रत्यक्षात मदत करू शकाल.
3) काळजी करता असे दाखवा आज पालक सुद्धा माेबाइल, साेशल मीडिया, टेलीव्हिजनमध्ये जास्त वेळ घालवितात. अशा वेळी किशाेरवयीन मुलेही आपले असे एक जग तयार करतात.आपल्या दैनंदिनीत एक वेळ निश्चित करा. जसे की, मुलांबराेबर जेवण करा, त्यांच्याबराेबर टीव्ही पाहा, काही वेळ चाला, एकत्र बसून दिवसभर तुमच्याबराेबर काय झाले, तुमचा दिवस कसा गेला? या विषयावर बाेला. त्यामुळे त्यांना समजेल की, तुम्ही त्यांची किती काळजी घेता.