टीम लीडरमधील काही गुणवैशिष्ट्ये जाणून घ्या

    10-May-2026
Total Views |
 

team 
 
टीम लीडर म्हणून तुमचा हेतू कितीही चांगला असला, तुमची माेहीम चांगली असली तरी तुम्ही जे काही नियाेजन केले आहे ते अचूक आणि याेग्य असावे लागते.तुम्हांला अचूक नियाेजन करायचे असेल तर त्यासाठी विचार आवश्यक असताे.पुढचा विचार, दाेन महिन्यांनंतरचा, दाेन वर्षांनंतरचा, दहा वर्षांनंतरचा विचार आवश्यक असताे. त्याचबराेबर व्यवस्थापक म्हणून तुम्ही करणार असलेल्या कृतीचे काय परिणाम हाेणार आहेत, हे देखील लक्षात घ्यावे लागते. अमुक गाेष्ट केली तर काय परिणाम हाेतील आणि नाही केली तर काय हाेईल याचाही वेध घ्यावा लागताे.याला विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे असे म्हटले तर वावगे हाेणार नाही.
 
संवाद: काय केले पाहिजे याची नेम की माहिती कर्मचाऱ्यांना असणे आवश्यक असते. त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे देखील त्यांना अचूकपणे माहिती असणे जरुरीचे असते. चांगल्या संवादातूनच हे शक्य हाेते. त्यामुळेच व्यवस्थापकाकडे अथक संवादशक्ती असणे गरजेचे असते.संवाद करताना त्याला कधीही थकून चालत नाही. त्याची श्रवणशक्ती चांगली असली पाहिजे. चांगल्या पद्धतीने संवाद साधण्यासाठी समाेरच्या व्यक्तीचे म्हणणे नीट ऐकणे जरुरीचे असते. प्रभावी संवाद काैशल्यासाठी लक्षपूर्वक ऐकता येणे आणि तीक्ष्ण नजरेची गरज असते. त्यासाठी कामाच्या ठिकाणी निरीक्षण करत िफरा, कंपनीच्या कॅेटेरियामध्ये न्याहरी, भाेजन घ्या. त्याठिकाणी तुमचे डाेळे आणि कान जागे ठेवा. चांगला संवादक नेहमी काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी याेग्य व्यक्तीला, याेग्य प्रश्न विचारताे. त्याचवेळी आपण सहकाऱ्यांची काळजी घेत असल्याचे त्याच्या कृतीतून दिसते.
 
प्रशासक: चांगला व्यवस्थापक हा चांगला प्रशासकही असावा लागताे. इंग्रजी भाषेतील अ‍ॅडमिनिस्टर हा शब्द मिनिस्टर या शब्दपासून तयार झाला आहे. मिनिस्टर म्हणजेच प्रत्येक प्रकल्पाचे तपशीलवार व्यवस्थापन करण्याची सवय. व्यवस्थापनात शिस्त ही अंतर्भूत असते. अनेक कृती व कामातून ठरलेले काम ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे यातून प्रशासकाचे व्यवस्थापकीय काैशल्य व क्षमता दिसून येते.