स्वभावात बदल घडविणे अजिबात अश्नय नाही

    01-May-2026
Total Views |
 

Health 
 
बदलणे अवघड मानले जाते. विशेषत: स्वभाव बदलणे खूप कठीण असते. असे मानले जाते की, ज्याचा जाे स्वभाव हाेताे, जी सवय लागते त्याला इच्छा असूनही बदलता येत नाही. अनेक लाेक आहेत. त्यांचे अनेक स्वभाव आहेत, अनेक सवयी आहेत. काेणाचा रागाचा, काेणाचा लाेभाचा, काेणाचा कामवासनेचा, तर काेणाचा भीतीचा स्वभाव असताे.त्यांना बदलणे इतके अवघड मानले गेले आहे, कारण की, मानवी मेंदूच्या विषयात आपल्याला असलेली माहिती अजून पूर्णपणे विकसित हाेऊ शकलेली नाही. असंख्य वैज्ञानिक मेंदूचा अभ्यास करण्यात गुंतलेले आहेत. या विषयावर व्यापक संशाेधन सुद्धा समाेर येत आहे. पण तरीही असे मानले जात आहे की, मेंदूचा दहा ट्नके भाग सुद्धा स्पष्ट हाेऊ शकला नाहीये. आपल्या सर्व वृत्ती आणि प्रवृत्तींचे केंद्र याच मेंदूत आहे.
 
टाेनी राॅबिन्सन यांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला माेठे यश प्राप्त करायचे असेल, तर तुम्ही स्वत:ला आपल्या मर्यादांच्या पलीकडे ढकलावे लागेल. स्वत:ला उत्साहित करावे लागेल. स्वत:ला एका उच्च मानसिक अवस्थेत घेऊन जावे लागेल. सर्वांत यशस्वी लाेक स्वत:साठी स्वत:च प्रेरक ठरतात. त्यांना वाटते की, स्वभावाला बदलता येऊ शकते.इतकेच नाही तर व्य्नतीचे पूर्ण व्य्नितमत्त्वच बदलता येऊ शकते. अनेक उदाहरणे आहेत. अनेक डाकू संत झाले आणि अनेक संत डाकू. वाईट स्वभावच बदलताे असे नाही, तर चांगला स्वभावही बदलताे. बदल आणि परिवर्तन यशस्वी आणि सार्थक जीवनाचे आधार आहेत. पुढे जाणारे लाेक मिळालेल्या यशामुळे समाधानी हाेऊन बसून राहात नाहीत. असे यासाठी की, त्यामुळे जीवनात नीरसपणा येताे असे नाही, तर प्रगतीचा मार्गही राेखला जाताे. राेज याची जाणीव ठेवली पाहिजे की, तुम्ही नवीन सुरुवात करत आहात, काही नवीन करत आहात.