नव्या आर्थिक वर्षात ठाणे महापालिकेच्या तिजाेरीत मालमत्ता कराचा अधिकाधिक भरणा व्हावा, या उद्देशातून प्रशासनाने 1 एप्रिलच्या पहाटेच ठाणेकरांना एसएमएसद्वारे देयके आणि ऑनलाइन भरण्याची लिंक पाठवून कर भरण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत अवघा दाेन दिवसांत 5435 ठाणेकरांनी महापालिकेच्या तिजाेरीत 5 काेटी 27 लाखांचा महसूल जमा केला.गेल्या म्हणजेच 2025-26 या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने ठरवून दिलेल्या 915 काेटींच्या उद्दिष्टापैकी 878 काेटींचा कर वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 68 काेटी 37 लाखांचा अधिक महसूल प्राप्त झाला आहे.
सुमारे 87.37 ट्नके कर डिजिटल आणि इतर आधुनिक माध्यमांतून भरला गेल्याने ठाणेकरांनी ऑनलाइन भरणा पद्धतीला स्पष्ट पसंती दिली आहे. यंदा महापालिकेने मालमत्ता कर विभागाला 1200 काेटींचे उद्दिष्ट दिआहे. त्यासाठी ई-बिलिंग, व्हाॅट्सअॅप आणि पहिल्याच दिवशी देयके पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.महापालिकेने 1 एप्रिलच्या पहाटे ठाणेकरांना माेबाइलवर एसएमएसद्वारे देयके आणि ऑनलाइन कर भरण्याची लिंक पाठवून कर भरण्याचे आवाहन केले हाेते. त्यास प्रतिसाद देऊन पहिल्याच दिवशी म्हणजे 1 एप्रिलला दिवसभरात 1884 नागरिकांनी 1 काेटी 67 लाखांचा कर जमा केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिलला 3551 नागरिकांनी 3 काेटी 60 लाखांचा कर जमा केला.असा एकूण दाेन दिवसांत 5435 ठाणेकरांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 5 काेटी 27 लाखांचा महसूल जमा केला.