राज्यात महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यास मंजुरी

    09-Apr-2026
Total Views |
 
 

program 
राज्यात महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र रिझिलन्स फायनान्सिंग प्राेग्राम या नवीन संकल्पनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.या कार्यक्रमांतर्गत जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या 165 काेटींच्या निधीचा आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत हाेणार आहे. आपत्तीग्रस्तांना गृहकर्जात; तसेच त्या परिसरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्याेजकांना कर्जासाठी सवलत व विमासुरक्षा उपलब्ध हाेणार आहे.यात असंघटित क्षेत्रातील कामगार, महिला उद्याेजक, बांधकाम, अन्य व्यावसायिक क्षेत्रातील छाेट्या घटकांनाही मदत हाेणार आहे. यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फाॅर ट्रान्सफाॅर्मेशन (मित्रा) अंमलबजावणी करणार आहे.
 
पूर, उष्णतेची लाट, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीत या घटकांना वित्तीय साह्य करता येणार आहे. आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी विभाग, जिल्हा, शहस्तरावरील प्रशासनाची प्रतिसाद क्षमता वाढवण्यासंदर्भात अंमलबजावणी गट म्हणून मित्रा संस्था काम करणार आहे.काेल्हापूर, सांगली, इचलकरंजीसह कृष्णा खाेऱ्यातील पुराचा धाेका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येतील.यात काेल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा व पंचगंगा नदी क्षेत्रातील कामांसाठी महाराष्ट्र मृद व जलसंधारण महामंडळ प्रकल्प अंमलबजावणी गट म्हणून काम करेल.या प्रकल्पांवरील देखरेखीसाठी आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्र्यांच्या संयु्नत अध्यक्षतेखाली प्रकल्प मूल्यांकन समिती स्थापन करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.