हार्ट अॅटॅक येण्याची बहुतेक कारणे ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे निर्माण झालेली असतात. यामुळेच हृदय राेगाचे तसेच इतर राेगांचे प्रमाण वाढले.एका केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की जर आपल्या जीवनशैलीत आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीत अगदी थाेडे बदल जरी केले तरी वयस्क माणसे 80 टक्के हृदयराेगाला दूर ठेवू शकतात. या विषयावर आधारित एक संशाेधन स्वीडन देशात करण्यात आले.यासाठी ज्या माणसांना हृदयराेग, मधुमेह, जास्त तणाव, किंवा कँसरसारखे राेग नाहीत अशा वयाच्या 45 ते 79 गटातील 20,000 माणसांचा अभ्यास करण्यात आला.
यात त्यांची जीवनशैली, सवयी आणि कमी धाेका असलेले वागणे यांचा अभ्यास करण्यात आला. त्यांचा सकस आहार असला तरी चांगल्या सवयींची म्हणजेच दिवसाला 10 ते 30 ग्रॅम इतके कमी अल्काेहाेल घेणे, धूम्रपान न करणे, चालण्याचा किंवा सायकल चालवण्याचा व्यायाम करणे, अशा प्रकारचा 40 मिनिटांचा दिवसालाव्यायाम करणे आणि जाड न हाेणे अशा स्वरूपाची बंधने त्यांच्यावर घालण्यात आली हाेती. असा 11 वर्षे त्यांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की ज्या माणसांनी हार्ट अॅटॅकला अटकाव करण्याच्या चांगल्या सवयी पाळल्या नाहीत त्यांच्या तुलनेत ज्यामुळे हार्ट अॅटॅक कमी येईल अशा चांगल्या सवयी आत्मसात केलेल्या पुरुषांची हार्ट अॅटॅक येण्याची 79 टक्के शक्यता कमी झाली. तसेच ज्या पुरुषांनी जेवढी चांगली जीवनशैली आत्मसात केली, त्या प्रमाणात त्यांचे हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण कमी झाले