ऑफिसात असलेले प्रतिस्पर्धी किंवा मित्राप्रमाणे दिसणारे लाेक सुद्धा निंदा करणारे ठरू शकतात. अशा वेळी असे श्नय आहे की, तुम्ही उत्तेजित व्हाल, किंवा असे काही बाेलाल जे तुम्ही बाेलायला नकाे असेल. जेव्हा काेणी असे काही बाेलेल, जे तुम्हाला पसंत नसेल, तेव्हा अशा वेळी काय कराल? वाईट बाेलू नका : धैर्य कायम ठेवा, उत्तर देण्याआधी विचार करा. जर तुम्हाला काेणी भडकवण्याचा प्रयत्न केला तर, उत्तर देण्याआधी काही काळासाठी शांत व्हा.जर तुम्ही लेखी उत्तर देऊ इच्छित असाल तर, उत्तर लिहिताना शब्दांची निवड थाेडे साैम्य हाेऊन करा. इंटरनेटच्या या काळात लक्षात घ्या की, कधीही असे काही लिहून साेडू नका, जे नंतर तुमच्या त्रासाचे कारण ठरेल.
प्रतिक्रिया देऊ नका : मित्राचा सल्ला घ्या, रागावू नका. जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुमच्या एखाद्या ब्लाॅग पाेस्टमध्ये तुम्ही व्य्नत केलेल्या विचारांचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, तर अशा वेळी रागावून त्वरित उत्तर देण्यापासून स्वत:ला थांबवा. कारण त्यावेळी तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त प्रतिक्रिया देऊ शकता. काेणा विश्वासपात्र सहकाऱ्याचा सल्ला घ्या. त्यानंतरच काेणतीही प्रतिक्रिया द्या.
विश्लेषण करा : टीकेला आपल्या स्तरावरही तपासा.जेव्हा लाेक तुमच्यावर टीका करत असतील तेव्हा तुमचा त्याबाबत विचार करण्यासाठी नाईलाज हाेताे. त्याच्या खरेपणाला आपल्या स्तरावर तपासा.त्याचबराेबर लक्षात ठेवा की, जेव्हा तुम्ही यशस्वी हाेऊ लागता, तेव्हा आजूबाजूचे लाेक अस्वस्थ हाेतात, घाबरतात. अनेक वेळा तर लाेक यासाठीही टीका करतात की, अशा प्रकारे ते आकर्षणाचे केंद्र ठरतात.
जे द्याल, तेच मिळेल : माफीची सीमा निश्चित करा. सेल्फ हेल्प गुरू नेहमी हे सांगत आले आहेत की, जाे तुमच्याविषयी वाईट बाेलत असेल त्याला माफ करा. पण त्याची एक सीमा असायला हवी. काळाबराेबरच लाेकांना ते सर्व मिळते, ज्यावर त्यांचा ह्नक असेल. एखाद्या दिवशी लाेक तुमचाही संदर्भ देतील आणि तुमचा काेणी विश्वासू सहकारी तुम्हाला प्रश्न विचारेल, तर तुम्ही त्याला ईमानदारीने उत्तर देऊ शकाल.