मुंबई महापालिकेच्या तिजाेरीत 7611 काेटींचा महसूल

    09-Apr-2026
Total Views |
 

BMC 
 
मुंबई महापालिकेच्या कर आणि संकलन विभागाने मालमत्ता कर संकलनात यंदा विक्रमी कामगिरी केली आहे. मालमत्ता कर संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम माेडीत काढून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निर्धारित करण्यात आलेल्या 7341 काेटींच्या सुधारित उद्दिष्टाच्या तुलनेत महापालिकेने 7610 काेटी 90 लाखांचा मालमत्ता कर संकलित केला आहे. 31 मार्चला एकाच दिवशी 399 काेटी 74 लाखांचा महसूल जमा करून नवा विक्रम नाेंदवण्यात आला.महापालिका आयु्नत आश्विनी भिडे यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काैतुक केले.महापालिकेच्या अतिर्नित आयु्नत डाॅ.अश्विनी जाेशी यांच्या मार्गदर्शनाखाली; तसेच सहआयु्नत (कर व संकलन) विश्वास शंकरवार आणि कर संकलक गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली विभागाने मालमत्ता कर संकलनासाठी व्यापक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले.नागरिकांनी वेळेत मालमत्ता कर भरावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली.
 
करभरणा सुलभ व्हावा यासाठी साप्ताहिक; तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आणि ऑनलाइन भरणा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासाेबतचमाेठ्या थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करून थकबाकी वसुलीसाठी पाठपुरावा करण्यात आला. या सर्व उपक्रमांमुळे मालमत्ता कर संकलन अधिक परिणामकारक आणि गतिमान झाले.
मुंबई महापालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 7341 काेटींच्या मालमत्ता कर संकलनाचे सुधारित उद्दिष्ट ठेवले हाेते. कर विभागाने 7610 काेटी 90 लाखांचा कर संकलित केला. हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या 103.68 ट्नके इतके आहे. अतिर्नित दंडाच्या स्वरूपात 301 काेटी 13 लाख रुपयेही वसूल करण्यात आले.प्रशासकीय विभागनिहाय कामगिरीचा विचार करता के पूर्व (719 काेटी 23 लाख), जी दक्षिण (670 काेटी 64 लाख), के पश्चिम (622 काेटी 16 लाख), एच पूर्व (577 काेटी 78 लाख) आणि एच पश्चिम (536 काेटी 55 लाख रुपये) या विभागांनी सर्वाधिक मालमत्ता कर संकलन नाेंदवले.