मुंबईत गृहनिर्माण संस्थांनी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारावी: महापाैर रितू तावडे

    08-Apr-2026
Total Views |
 

water 
 
 
मुंबईतील पाण्याची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी विहिरी व कूपनलिकांची नियमित देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता करून आवश्यक त्या जलशुद्धीकरण यंत्रणा बसवाव्यात; तसेच भूजलाचा उपसा करताना ताे नियमानुसार व मर्यादेत राहील याची दक्षता घ्यावी. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण करणे महत्त्वाचे असून, सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरात अशी यंत्रणा उभारावी. दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी हा उपाय प्रभावी ठरेल, असे आवाहन मुंबईच्या महापाैर रितू तावडे यांनी केले. उन्हाची वाढती तीव्रता, जलसाठ्यांवरील वाढता ताण; तसेच पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून प्राप्त हाेत असलेल्या तक्रारींची दखल घेत महापाैर तावडे यांनी महापालिका जल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. मुंबईतील वाढत्या लाेकसंख्येमुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. आता उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पारंपरिक जलस्राेतांचे पुनरुज्जीवन, पर्यायी जलस्राेतांचा शाेध, नागरिकांच्या सक्रिय सहभागाद्वारे पाणी बचत व संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न करण्यावर भर देण्याची आवश्यकता महापाैरांनी व्य्नत केली. पाण्याचा अपव्यय टाळणे, पुनर्वापर वाढवणे, जलसंवर्धनाच्या सवयी अंगीकारणे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही महापाैरांनी केले.