राज्य शासनाच्या धाेरणामुळे क्रीडापटूंना सन्मान

    08-Apr-2026
Total Views |
 
 
 
spotr
क्रीडाक्षेत्र हा करिअरचा सक्षम पर्याय म्हणून समाेर येत असून, राज्य शासनाच्या सकारात्मक व कृतिशील धाेरणामुळे राज्यातील क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान प्राप्त हाेत आहे.विविध क्रीडाप्रकारांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या 372 खेळाडूंना शासकीय सेवेत विनापरीक्षा थेट सामावून घेण्यात आले आहे, असे सांगलीचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.भारतीय विद्यापीठे महासंघ (एआययू) आणि शिवाजी विद्यापीठाच्या विद्यमाने आयाेजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कनाेइंग व कयाकिंग (पुरुष व महिला) स्पर्धांचे उद्घाटन करताना पाटील बाेलत हाेते. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डाॅ. सुरेश गाेसावी यांच्यासह विविध मान्यवर व खेळाडू यावेळी उपस्थित हाेते.
 
भारत 2036च्या ऑलिंपिक स्पर्धे साठी सज्ज हाेत असून, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. राज्यातही अशाच सुविधा उभारण्यात येत आहेत.खेळांडूंना स्थैर्य व सन्मान देण्यासाठी विविध उपाय याेजण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले. कुलगुरू डाॅ.गाेसावी यांनी मनाेगत व्य्नत केले.प्रारंभी पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले; तसेच प्रदर्शनीय सामन्यांना मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफने प्रारंभ करण्यात आला. देशभरातील विद्यापीठांतील विद्यार्थी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.