श्रीदासबाेधाच्या एकाेणिसाव्या दशकातील सातवा समास ‘यत्ननिरूपण’ असून, त्यामध्ये श्रीसमर्थांनी महंताची आदर्श वागणूक, प्रयत्नांचे व अभ्यासाचे महत्त्व सांगितले आहे. केवळ एखादा मनुष्य ज्ञानी किंवा सिद्ध हाेऊन समाजाचे भले हाेत नसते, तर त्या ज्ञानी माणसाने स्वसंतुष्ट न राहता सम ाजात मिसळून सर्व समाजाला शहाणे करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते.म्हणूनच ज्ञानदान, लाेकसंग्रह, जगदांतर राखणे याचे महत्त्व श्रीसमर्थांनी पुन्हापुन्हा सांगितले आहे.असे वागणे केवळ प्रपंचातच नाही तर परमार्थम ार्गातही आवश्यक आहे, असाच त्यांचा आग्रह आहे.केवळ एखादी व्यक्ती उद्धरून जाऊन उपयाेगी नाही तर सर्व समाज उन्नत झाला पाहिजे, अशी त्यांची लाेककल्याणाची विचारधारा आहे.
या समासाचा प्रारंभ करताना ते सांगतात की, महंताने ठणठणीतपणे भरभरून कथेचे माप श्राेत्यांच्या पदरी घालावे.कीर्तनकाैशल्य आणि कथेमागील तत्त्वे व उपदेशाचे विवरण या दाेन्हींमध्ये काेणतीही कसर ठेवू नये.एखादा डाेंबारी तारेवरून चालताना पडला तर त्याची काय चूक झाली हे प्रेक्षकांना कळत नाही; पण दुसऱ्या डाेंबाऱ्याच्या चटकन लक्षात येते.त्याचप्रमाणे श्राेत्यांनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर देताना वक्त्याला वेळ लागला की, वक्ता कितपत ज्ञानी आहे, हे जाणकार श्राेत्यांना लगेच कळते व वक्त्याचे महत्त्व खलास हाेते. महंताने म्हणूनच पूर्ण ज्ञानाने आणि माेजकेच बाेलावे, श्राेत्यांच्या शंकांनी संतापून त्यांना बाेलू नये.वक्त्याने चिडचिड केली, तर त्याचीच अपूर्णता दिसून श्राेते त्याच्याकडे पाठ िफरवितात. हे सर्व लक्षात घेऊन आपल्यावर काेण खुश आहेत, काेण अप्रसन्न आहेत याची परीक्षा क्षणाेक्षणी करीत महंताने वागले पाहिजे.