बेडकाचा आवाज त्यानेही ताे आवाज ताेंडाने केला. एका हाताचा आवाज हाच असला पाहिजे असं त्याला अगदी मनाेमन वाटलं. सकाळी गुरूंपुढे येऊन, घंटा वाजवून विनम्र भावाने बसून बेडकाची डराव ताेंडानं केली, आणि गुरूंना म्हटलं-‘हाच ताे आवाज ना?’ गुरूंनी म्हटले - ‘वेड्या, हा तर बेडकाचा आवाज.एका हातानं वाजवलेल्या टाळीचा आवाज हा कुठे आहे?’ पुन्हा दुसऱ्या दिवशी विचार करून आला, तिसऱ्या दिवशी पण आला, राेज काहीतरी घेऊन यावं, विचारावं, हाच ना आवाज? गुरूंनी राेज म्हणावं हा ताे नाही, हा ताे आवाज नाही, हा ताे आवाज नाही, नाही. हा पण नाहीच. असं हाेत पावसाळा संपायची वेळ आली. ताे राेज काही तरी हुडकून आणायचा. कधी म्हणावं, रातकिड्यांचा आवाज, कधी म्हणावं, झाडांतून येणारा आवाज. कधी म्हणावं, पानगळीचा आवाज. कधी म्हणावं पावसाळ्यात पाऊस पडताना छपरावर हाेणारा आवाज! खूप आवाज आणले, पण गुरू त्या प्रत्येकाला नकार देत राहिले. छे-छे नाही, हा पण नाही, हाही नाही.मग त्याने येणं बंद केलं. मग बऱ्याच दिवसांनी परतला. घंटा वाजवली, चरणी फुलं अर्पण केली. हात जाेडून गुपचूप बसून राहिला. गुरू म्हणाले- आणलंय का काही उत्तर? आवाज आणला का कुठला? मान वर करून ताे फ्नत त्यांच्याकडे पाहू लागला. माैन, चूप. गुरूंनी म्हटलं, हा, हाच ताे आवाज आता तुला कळलेला आहे.एका हाताची टाळी कशी वाजते ते.