मातृत्व आणि करिअर यांचा ताेल कसा संभाळता येईल?लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आई हाेण्याचं एक सुखद स्वप्नं असतं. या स्वप्नामुळेच तिला कुटुंबात आणि समाजात मानाचं स्थान मिळतं.पण आजच्या आधुनिक विचारांच्या स्त्रिया खूप उशिरा लग्न करतात. करिअर करण्याच्या नादात गर्भधारणा टाळतात.ज्यामुळे गर्भधारणेसाठी उपयुक्त काळ पुढे जाताे. वय वाढल्यानंतर गर्भधारणा, प्रसूती या गाेष्टी गुंतागुंतीच्या हाेतात. जे आई आणि बाळ दाेघांसाठीही घातक ठरते. वाढत्या वयात गर्भधारणा करण्याने स्त्रियांना प्रसूतीदरम्यान अनेक समस्या आणि जटिलता निर्माण हाेतात. नैसर्गिक पद्धतीने प्रसूती न हाेण्याने वेदना आणि त्रास सहन करावा लागताे. कधी कधी जन्माच्या वेळेस बाळाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जसं जसं स्त्रीचं वय वाढतं तसअनेक आजार हाेण्याची शक्यता वाढते.ज्यामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांचा प्रामुख्याने समावेश हाेताे.
कधी कधी अधिक वयाच्या स्त्रियांच्या गर्भाशयात गाठी हाेतात. तसंच प्रसूतीदरम्यान खूप अधिक प्रमाणात रक्तस्त्राव हाेताे. ज्याम ध्ये शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करावी लागते.सामान्यतः स्त्रियांमध्ये वयाच्या चाळीशीनंतर रजाेनिवृत्तीची प्रवृत्ती दिसून येते. 20-25 वर्षांच्या स्त्रियांना प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता कमी भासते. तसंच प्रसूतीही नैसर्गिक हाेते. जर एखाद्या स्त्रीने खूप उशिरा मुलास जन्म दिला तर ते वाढविणंही त्या स्त्रीला अवघड जातं.कारण तिची कार्यक्षमता कमी झालेली असते. आपण हे मान्य करायला हवं की, स्त्रीसाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच करिअरही गरजेचं आहे.तेवढंच वेळेवर लग्न आणि आई हाेणंही आवश्यक आहे. वेळीच जर स्त्रीने गर्भधारणेचा विचार केला नाही तर नंतर तिलाच अधिक त्रास सहन करावा लागेल. तिने जास्त वयात बाळाला जन्म दिला, तर बाळ पूर्णतः निराेगी असण्याची शक्यता कमी हाेते.त्या मुलात काही शारीरिक आणि मानसिक कमतरता आढळतात.उपचार शास्त्रानुसार, आई बनण्यासाठी 20-25 वर्षांदरम्यानचा काळ अधिक उपयुक्त मानला जाताे. यानंतर अनेक समस्या निर्माण हाेऊ शकतात.