कुंभमेळ्याशी संबंधित कामांना प्राधान्य द्यायला हवे

    08-Apr-2026
Total Views |
 
 

kumbh 
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी हाेणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सुरू केलेल्या कामांना प्रशासकीय पातळीवर सर्वाेच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मुख्य सचिव अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली येथे घेण्यात आला.यावेळी विभागीय आयु्नत डाॅ. प्रवीण गेडाम, विशेष पाेलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयु्नतशेखर सिंह, महापालिकेच्या आयु्नत मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पाेलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पाेलीस उपायु्नत किरणकुमार चव्हाण, सहायक जिल्हाधिकारी डाॅ. पवन दत्ता यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
 
साधुग्राम परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य द्यावे. भाविक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ओएफसी केबल नेटवर्क, वाहनव्यवस्थेचे नियाेजन करावे. जिल्ह्यात सुरू असलेले रस्ते, पूल, रिंगराेड, द्वारका जंक्शन, नवीन घाट बांधणी, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, नवीन डीपी राेड, ओझर विमानतळ व नाशिक राेड, ओढा, कसबे-सुकेणे, खेरवाडी, देवळाली कॅम्प येथील रेल्वे स्थानकाचा विकास, पार्किंग, भाविकांसाठी मूलभूत साेयीसुविधा यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेत या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.