येथील सांगली जिल्ह्यात व महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सतत अग्रेसर असलेल्या सियाराम सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बापट मळा, महावीर उद्यानात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटक मारुती नवलाई आणि संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील यांच्या माध्यमातून भजन, भ्नितगीत गायनाचा कार्यक्रम पहाटेपासूनच सुरू हाेता. यामध्ये हरिप्रिया महिला भजनी मंडळाच्या संगीता मध्याळी, स्मिता कुलकर्णी, ज्याेती राऊतमारे, सुनीता बर्वे, उज्वला कळंबे, सुरेखा हुनुगरे, सुनंदा गाेंदकर, अनिता कुलकर्णी, प्रज्ञा लिमये, पल्लवी मेहेंदळे, मनीषा पाेतदार, राधिका भडेकर इ.नी भजन व गीते सादर केली. सागर काळेबेरे यांनी तबलावादन केले. सायंकाळी आलापिनी भजनी मंडळानेही भ्नितगीते सादर केली. शुभांगी जामदार यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी स्वागत केले. नारायण चाेपडे, चबगाेड पाटील, दत्तात्रय काटकर तसेच उद्याेजक गजानन आडमणी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.