मध्य पूर्वेतील इराण-इस्राईल युद्धाला एक महिना उलटल्यानंतर संपूर्ण साैराष्ट्राची औद्याेगिक आणि व्यावसायिक रचना उद्ध्वस्त झाली आहे. 28 फेब्रुवारी राेजी सुरू झालेल्या युद्धाच्या नावाखाली स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या बेसुमार साठेबाजी, अफवा पसरवणे आणि घाेर निष्क्रियतेमुळे सामान्य जनता आणि उद्याेजकांची परिस्थिती दयनीय झाली आहे.राजकाेटमधील अभियांत्रिकीपासून ते माेरबीमधील सिरॅमिक आणि जामनगरमधील पितळ उद्याेगापर्यंत, युद्धाचा परिणाम प्रत्येक स्तरावर जाणवत आहे. परिणामी, एकूण 2000 काेटी रुपयांचा फटका बसला आहे.राजकाेट, माेरबी व जामनगर जिल्ह्यांमध्ये 3000 हून अधिक औद्याेगिक युनिट ठप्प झाले आहेत. स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यामुळे 6000 हून अधिक हाॅटेल, रेस्टाॅरंट, केटरर्स, मेस, फूड ट्रक्स आदी व्यवसायांना फटका बसला आहे.
सिलिंडरच्या काळ्या बाजाराने मध्यमवर्गीयांचे बजेट काेलमडले आहे.काळ्या बाजारात 900 रुपयांच्या सिलिंडरची किंमत 1500 रुपयांपर्यंत पाेहाेचली आहे, तर व्यावसायिक किंमत 3000 रुपयांच्या पुढे गेली आहे.इराण युद्धामुळे एलपीजी व्यतिरिक्त प्राेपेन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाला असून, या युद्धाचा परिणाम माेरबी-राजकाेटमधील सिरॅमिक उद्याेग, स्थानिक हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि सामान्य गृहिणींच्या बजेटवर झाला आहे. गॅस आणि इंधनाच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे साैराष्ट्राच्या उत्पादन क्षेत्राला फटका बसला आहे.केवळ 50 हजार इंजिनीअरिंग आणि ऑटाे पार्ट्स युनिटमध्ये कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे 30 टक्के उत्पादनात कपात झाली आहे. जर हे युद्ध अधिक काळ चालू राहिले, तर साैराष्ट्रातील एमएसएमई उद्याेगांमध्ये माेठ्या प्रमाणावर कामगार कपात आणि टाळेबंदीची भीती आहे. युद्धामुळे मध्य पूर्वेकडून येणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे स्थानिक बाजारपेठेत गाेंधळ निर्माण झाला आहे.
एलपीजीच्या तुटवड्याच्या अफवांमुळे लाेक ‘पॅनिक बुकिंग’ करू लागले आहेत आणि एजन्सींना 10 ते 15 दिवसांची प्रतीक्षा यादी दिसत आहे.व्यावसायिक गॅसच्या दरवाढीचा आणि तुटवड्याचा सर्वात माेठा परिणाम खराद्य व्यवसायावर झाला आहे. राजकाेट आणि महामार्गांवरील हाॅटेल, रेस्टाॅरंट आणि मेस यांसारखी अंदाजे 2500 ते 3000 खाद्य आणि पेय युनिट्स अडचणीत आहेत.छाेट्या लाॅरी आणि ट्रक मालकांच्या दैनंदिन कमाईत 40 ट्न्नयांची घट लग्नाचा हंगाम सुरू असूनही, गॅसच्या अनुपलब्धतेमुळे केटरिंग कंत्राटदार जुन्या दरात काम करण्यास तयार नाहीत. 10,000 हून अधिक छाेट्या लाॅरी आणि ट्रक मालकांच्या दैनंदिन कमाईत 40 टक्क्यांची घट झाली आहे.अनेक हाॅटेलना आता गॅसऐवजी इलेक्ट्रिक इंडक्शन किंवा पुन्हा काेळसालाकडी शेगड्या वापरण्यास भाग पडले आहे. गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे निर्माण झालेल्या घबराटीमुळे मागणी माेठ्या प्रमाणावर वाढली असून, त्यामुळे इलेक्ट्रिक इंडक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे.