विचारांमधील बदल आत्म्यापासून व्हायला हवा

    07-Apr-2026
Total Views |
 

mind 
 
आता खूप साऱ्या अशा गाेष्टींचा हल्ला हाेईल की आपण महामारीला विसरून जाऊ आणि त्याचे फ्नत सावट राहील.जेव्हा व्हायरसविषयी बाेलले जाते तेव्हा चीनची आठवण येते आणि जेव्हा पक्षबदलावर चर्चा हाेते, तेव्हा बिभीषणाचे स्मरण हाेते. पण तेव्हाच्या आणि आताच्या स्थितीत खूप फरक आहे. बिभीषणासाेबतच हनुमान हाेते तर आज जे पक्षबदल करीत आहेत त्यांच्यासाेबत अनुमान असते. हा ‘अनुमान’ शब्द साहित्याचा खूप लाडका शब्द आहे. याला लाेक अंतरात्माही म्हणत असतात.स्वतःचा दूरदर्शीपणाही मानतात.एक पक्षबदल म्हणजेच बदल तर आता आपणही करीत आहाेत. लाॅकडाऊनमधून अनलाॅकमध्ये बदल. पण हे लक्षात ठेवा की बदल कसलाही असला तरी आत्म्यासाेबत व्हायला हवा.अनलाॅकनंतर ज्या प्रकारे आपण इकडे-तिकडे जात आहाेत, त्यात संपूर्ण दक्षता व ईमानदारी ठेवायला हवी. इथे ईमानदारीचा अर्थ मास्क, एकमेकांपासून याेग्य अंतर आणि व्हॅ्नसीनेशन.हा आजार अद्यापही रहस्यमय आहे आणि या रहस्याचा सामना करण्यात हे त्रिशूळच उपयाेगी पडेल. देव निसर्गाच्या माध्यमातून आपल्याकडून अपेक्षा करीत आहे की, तुम्ही प्रामाणिक पावले उचला, बेईमानांना मी पाहून घेईन.