आनंदासाठी लहान मुलांचा निरागसपणा जपायला हवा

    06-Apr-2026
Total Views |
 

child 
 
प्राैढ किंवा माेठ्या लाेकांच्या तुलनेमध्ये लहान मुले अधिक आनंदी असतात, असे अनेकदा दिसले आहे.आनंद मिळवणे हा जर एक अभ्यास विषय मानला, तर लहान मुले ही त्या विषयातील तज्ज्ञ असतात, असे म्हटले तरी अतिशयाे्नती हाेणार नाही, तर वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर किंवा ज्येष्ठत्वाकडे वाटचाल करत असताना मनामधील बालपण किंवा लहान मूल ज्यांना जपता येते ते लाेक जीनियस राहू शकतात. कारण ते मनामध्ये खराेखरीच सुखद भाव जिवंत ठेवून राहतात. हा ताेच भाव असताे जाे परमेश्वराने लहान मुलांना प्रदान केलेला असताे.म्हणून ताे भाव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा.अब्राहम लिंकन असे म्हणत की, लाेक तेवढेच आनंदी राहतात जेवढे आनंदी राहण्याचा पर्याय ते लाेक निवडत असतात. आपण आनंदी राहू इच्छित असू, तर आपण स्वतःशी हे बाेलत राहायला हवे की,
 
 प्रत्येक गाेष्ट चांगल्या पद्धतीने हाेत आहे. हे आयुष्य अत्यंत चांगले आहे.
 
 आपल्याला या आयुष्याने खूप काही दिले आहे आणि आनंद मिळत आहे.
 
थाेडक्यात म्हणजे सुखी राहिले पाहिजे, हा पर्याय माझ्याकडे हाेता आणि मी ताे निवडला आहे. हा पर्याय आपण मनापासून निवडला असेल, तर आपण खराेखरच सुखी राहू शकताे.