हा आठवडा तुमत्यासाठी संतुलन व हुशारीने पुढे जाण्याचा संकेत देत आहे.तुम्ही तुमची कामे नियाेजनपूर्वक पूर्ण कराल% ज्यामुळे तुम्हाला कामाचे उत्तम परिणाम मिळतील. तुमच्या आर्थिक स्थितीत स्थैर्य राहील. तसे काही आवश्यक खर्च समाेर येण्याची श्नयता आहे. धैर्य व विवेकाने काम करणे लाभदायक.
नाेकरी-व्यवसाय : करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगती देणारा असणार आहे. कार्यस्थळावर तुमचे श्रम व शिस्त वाखाणली जाईल. नव्या जबाबदाऱ्याही मिळू शकतात. ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल असणार आहे. विशेषकरून नव्या याेजनांसाठी.
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन सामान्य राहणार आहे.कुटुंबीयांसाेबतचे संबंध मधुर राहतील पण छाेट्या छाेट्या गाेष्टींवरून वाद हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाेलण्यावर ताबा ठेवायला हवा.जीवनसाथीची मदत मिळेल. प्रेमसंबंधात स्थैर्य राहील.
आराेग्य : आराेग्याच्या दृष्टिने हा आठवडा सामान्य राहील पण कामाचा व्याप वाढल्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव व थकवा जाणवू शकताे. नियमित याेग व ध्यान करणे तुमच्यासाठी हितकर ठरेल. पचनासंबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
शुभदिनांक : 06, 07, 11
शुभरंग : पांढरा, क्रीम, गुलाबी
शुभवार : साेमवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम संयमाने करावे.
उपाय : या आठवड्यात राेज शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पाणी वाहावे..