वृषभ

    05-Apr-2026
Total Views |

aries 
 
 
हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला थोडा मानसिक ताण राहू शकतो पण हळू हळू परिस्थिती तुमच्या बाजुने होत जाईल. आर्थिक दृष्टीने हा काळ संतुलित राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.
 
■ नोकरी-व्यवसाय : या आठवड्यात नोकरदार जातकांना त्यांच्या परिश्रमाचे उत्तम परिणाम मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी कामाने संतुष्ट राहतील ज्यामुळे बढती वा नवी जबाबदारी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा नेहमीपेक्षा चांगला राहील. पण नवी गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
 
■ नातीगोती या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवन सुखद राहणार आहे. घरात सकारात्मक वातावरण टिकून राहील व कुटुंबीयांकडून तुम्हाला हवी ती मदतही मिळेल. जीवनसाथीसोबत तुमचे संबंध मधुर राहतील व परस्परसामंजस्य मजबूत होईल. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल.
 
■ आरोग्य : आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहणार आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी-पडसे व थकवा जाणवू शकतो. नित्यनेमाने व्यायाम करणे व संतुलित आहार घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. उन्हात जाताना उन्हाचा त्रास टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी.
 
शुभदिनांक : ०६०७ ११
 
■ शुभरंग पांढरा, क्रीम, गुलाबी
 
■ शुभवार सोमवार, शुक्रवार, शनिवार
:
■ दक्षता या आठवड्यात आर्थिक निर्णय कोणताही निर्णय घाईत घेऊ नये. अनावश्यक खर्च टाळावा.
 
उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीदेवीची पूजा करावी व ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः मंत्राचा जप करावा. यामुळे घन व सुखसमृद्धी लाभेल.