हा आठवडा तुमच्यासाठी बदल व आत्मचिंतनाचा असणार आहे. आपण आपल्यात दडलेल्या क्षमता ओळखण्याचा प्रयत्न कराल व जीवनात पुढे जाण्यासाठी रणनीती बनवू शकता. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. पण अचानक खर्च उद्भवण्याची श्नयता आहे त्यामुळे सावध राहावे.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरच्या क्षेत्रात परिश्रम व धैर्याची परीक्षा द्यावी लागू शकते. कार्यस्थळावर काही आव्हानांचा सामना करावा लागू शकताे. पण तुम्ही तुमच्या हुशारीने ती पार पाडाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा मध्यम राहील त्यामुळे माेठी गुंतवणूक टाळणे हिताचे राहील.
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या नात्यांबाबबत तुम्ही थाेडे भावुक राहू शकता. कुटुंबात एखाद्या गाेष्टीवरून मतभेद उत्पन्न हाेण्याची श्नयता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वागण्या-बाेलण्यावर ताबा ठेवण्याची गरज आहे.जीवनसाथीसाेबत वेळ घालवल्यास जीवनात माधुर्य येईल.
आराेग्य : हा आठवडा आराेग्याबाबत सावध राहण्याचा संकेत देत आहे.थकवा, तणाव वा झाेपचा अभाव जाणवू शकताे. नित्यनेमाची दिनचर्या राखणे आणि संतुलित आहार घेणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तसेच ध्यानधारणा व याेगाने तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते.
शुभदिनांक : 05, 08, 09
शुभरंग : हिरवा, पिवळा, नारंगी
शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
दक्षता : या आठवड्यात रागात व आवेशात निर्णय घेऊ नये. त्यामुळे नुकसान हाेऊ शकते.
उपाय : या आठवड्यात मंगळवारी हनुमानाची पूजा करावी व ॐ हनुमते नम: मंत्राचा जप करावा. यामुळे साहस व आत्मबळ वाढेल.