धनु

    05-Apr-2026
Total Views |
 

aries 
हा आठवडा तुमच्यासाठी उत्साह व नव्या संधींनी भरलेला असणार आहे. तुम्ही तुमच्या सकारात्मक दृष्टिकाेन व ऊर्जेच्या बळावर अनेक कामे यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळतील तसेच उत्त्पन्नाचे नवे स्राेतही बनू शकतात. पण खर्चावर ताबा ठेवायला हवा.
 
 नाेकरी-व्यवसाय : करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा मार्ग प्रशस्त करील. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनत व समर्पणाची स्तुती हाेईल. उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे तुमच्या कामाला वेग येईल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक राहील व एखाद्या नव्या प्राेजे्नटमधून फायदा हाेऊ श्कताे.
 
 नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवन सुखदराहील. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. जीवनसाथीसाेबत तुमचे संबंध मजबूत हेाेतील व सामंजस्यही वाढेल. प्रेमसंबंधातही माधुर्य टिकून राहील आणि नात्यांमध्ये विश्वास वाढेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमची तब्बेत चांगली राहील आणि तुम्हाला स्वत:ला तरतरी जाणवेल. पण या आठवड्यात जास्त धावपळ करावी लागल्यामुळे तुम्हाला थकवाजाणवू शकताे. त्यामुळे तुम्हाला विश्रांती करण्याचीही गरज भासेल. साेबतच नियमित व्यायाम करावा व संतुलित आहार घ्यावा.
 
 शुभदिनांक : 05, 08, 09
 
 शुभरंग : हिरवा, पिवळा, नारंगी
 
 शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
 
 दक्षता : या आठवड्यात अतिआत्मविश्वास टाळावा व काेणताही माेठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
 
 उपाय : या आठवड्यात गुरुवारी श्रीविष्णूची पूजा करावी व ॐ नमाे भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा.