आपला मेंदू असे म्हणत असेल की, आपण खूप दमलेले आहात, तर आपले शरीर, आपल्या शरीरातील नसा, मांसपेशी यादेखील तेच मान्य करून तीच गाेष्ट खरी आहे, असे मानून तिचा स्वीकार करतात; पण आपला मेंदू एखाद्या कामात तल्लीन झाला असेल, रुची घेऊन एखादे काम करत असेल, तर आपण दीर्घकाळपर्यंत अजिबात न थकता न दमता काम करत राहू शकताे.हेच उदाहरण किंवा हीच पद्धती आपण इतरही अनेक कामांत उपयाेगी आणू शकताे. म्हणजे काही अध्यात्मिक क्षेत्रातील लाेक असे म्हणतात की, ईश्वर हा जर आपला ऊर्जेचा स्राेत आहे असे मानले, तर मग ब्रह्मांडातील ऊर्जा, आण्विक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, अध्यात्मिक ऊर्जा या सगळ्या आपल्या मदतीला आहेत, असे मानून आपण काम करू शकताे.फ्नत आपण तसा विश्वास ठेवायला हवा आणि तशा सूचना मेंदूसह शरीराला द्यायला हव्यात. आपल्याला ती ऊर्जा मिळत असल्याचा अनुभव आपाेआपच मिळताे. एकंदरीतच आपला मेंदू, आपल्या मनात येणारे विचार यांच्या स्थिती-परिस्थितीवर पुढील अनेक गाेष्टी अवलंबून असतात.