तुला

    05-Apr-2026
Total Views |
 
 

aries 
 
हा आठवडा तुमच्यासाठी संतुलित व हुशारीने निर्णय घेण्याचा असणार आहे.तुम्ही तुमच्या व्यवहार व कूटनीतिच्या बळावर अनेक कठिण परिस्थिती सहजतेने साेडवू शकाल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत. पण खर्चावर ताबा ठेवण्याची गरज असणार आहे. सारी कामे मनासारखी हाेतील.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा करिअरक्षेत्रात सकारात्मक परिणाम देणारा राहील. कार्यस्थळावर तुमच्या कार्यशैलीची प्रशंसा हाेईल. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्या भविष्यात प्रगतीचे मार्ग उघडतील. व्यापाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. विशेषत: भागीत केलेल्या कामातून फायदा हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहणार आहे. जाेडीदाराशी तुमचे संबध मधुर राहतील व आपसात ताळमेळ असेल.प्रेमसंबंधातही जवळीक वाढेल. कुटुंबासाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
ज्यामुळे तुमच्या मनाला शांती लाभेल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्बेत सामान्य राहील पण तुम्हाला थकवा आणि जागरणाचा त्रास हाेण्याची श्नयता आहे.मानसिक दडपणामुळे तुम्हाला काेणत्याही कामात रस वाटणार नाही. तुम्ही तुमच्या तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. विशेषकरून तुम्हाला त्वचेच्या आणि डाेळ्यांच्या समस्या सतावू शकतात.
 
 शुभदिनांक : 06, 07, 11
 
 शुभरंग : पांढरा, क्रीम, गुलाबी
 
 शुभवार : साेमवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात घाई करणे टाळावे. इतरांचे ऐकून काेणतेही पाऊल उचलू नये. .
 
 उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा करावी व ॐ श्रीं महालक्ष्म्यै नम: मंत्राचा जप करावा. यामुळे सुखसमृद्धी व वैभवात वाढ हाेईल.