हा आठवडा तुमच्यासाठी नव्या संधी व बदलांनी भरलेला असणार आहे. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्ता व संवाद काैशल्याच्या बळावर अनेक समस्या साेडवण्यात यशस्वी राहाल. आर्थिक स्थितीत सुधारणा हाेण्याचे संकेत आहेत, पण अनियाेजितक खर्च तुमच्या याेजनांवर परिणाम करू शकतात हे लक्षात घ्यावे.
नाेकरी-व्यवसाय : करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा प्रगती करून देणारा आहे. कार्यस्थळावर तुमचे परिश्रम व हुशारीचे काैतुक हाेईल. नवे प्राेजे्नट वा जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापारी वर्गासाठी विशेषकरून आपण एखाद्या नव्या विचारावर काम करीत असाल तर त्यासाठी हा काळ अनुकूल आहे.
नातीगाेती : नात्यांबाबत हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक राहील.कुटुंबासाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यामुळे संबंधात माधुर्य येईल.जीवनसाथीदाराकडून तुम्हाला विशेष मदत मिळेल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील.प्रेमसंबंधात स्थैर्य आणि विश्वास वाढेल.
आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्बेत सामान्य राहण्याची श्नयता आहे.परंतु तुम्हाला मानसिक तणावापासून दूर राहण्याची गरज आहे. जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकताे. याेग, ध्यानधारणा आणि पुरेशी झाेप घेणे तुमच्यासाठी अतिशय फायद्याचे ठरू शकते.
शुभदिनांक : 06, 07, 11
शुभरंग : पांढरा, क्रीम, गुलाबी
शुभवार : साेमवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात काेणत्याही गाेष्टीची जास्त चिंता करू नये.
उपाय : या आठवड्यात बुधवारी श्रीगणेशाची पूजा करावी व ॐ गं गणपतये नम: मंत्राचा जप करावा. यामुळे बुद्धी व यश वाढेल.