मकर

    05-Apr-2026
Total Views |
 

aries 
हा आठवडा तुमच्यासाठी तुमच्या कष्टाचे आणि धैर्याचे फळ देणारा असेल.तुम्ही तुमच्या लक्ष्याबाबत गंभीर राहाल व नियाेजनासह काम कराल. ज्यामुळे हळू हळू यश तुमच्या पायाशी येईल. तुमच्या आर्थिक परिस्थितीतही स्थैर्य राहील. पण अनावश्यक खर्च टाळायला हवेत.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक राहील.कार्यस्थळावर तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ हाेईल. पण तुम्ही त्या हुशारीने पार पाडाल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत मिळेल. व्यापाऱ्यांसाठी काळ नेहमीपेक्षा चांगला राहील. विशेषत: जुन्या कामातून फायदा मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या काैटुंबिक जीवनात शांतता टिकून राहील. घरातील सदस्यांची मदत मिळेल व आपसातील संबंध भक्कम हाेतील.जीवनसाथीसाेबत उत्तम ताळमेळ राहील. प्रेमसंबंधातही स्थिरता टिकून राहील व परस्परांवरील विश्वासात वाढ हाेईल.
 
 आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. पण कामाचा व्याप वाढल्यामुळे थकवा व अंगदुखीची समस्या वाढू शकते. विशेषत: स्क्रीन टाइम कमी करून वेळेवर झाेपणे व जागे हाेणे गरजेचे आहे. कमी झाेपेमुळे अशक्तपणाही येण्याची श्नयता आहे. नियमित व्यायाम व पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.
 
 शुभदिनांक : 06, 07, 11
 
 शुभरंग : पांढरा, क्रीम, गुलाबी
 
 शुभवार : साेमवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात कामाच्या प्रेशरपायी तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नये. .
 
 उपाय : या आठवड्यात शनिवारी शनिदेवाची पूजा करावी आणि ॐ शं शनैश्चराय नम: मंत्राचा जप करावा..