कर्क

    05-Apr-2026
Total Views |

aries 
हा आठवडा तुमच्यासाठी भावनिक व कौटुंबिक दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे व वैयक्तिक जीवनाकडे अधिक लक्ष द्यावे. आर्थिक स्थिती सामान्य राहील. पण खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याबाबत संतुलन राखायला हवे. जुनी कामे पूर्ण झाल्यामुळे संतोष राहील.
 
■ नोकरी-व्यवसाय हा आठवडा कार्यस्थळावर थोडा आव्हानात्मक राहू शकतो. तुम्हाला तुमच्या कामात अधिक मेहनत व धैर्य राखण्याची गरज जाणवेल. वरिष्ठांसोबत ताळमेळ राखून चालायला हवे. व्यापाऱ्यांनी या आठवड्यात दक्षता बाळगायला हवी कोणतीही गुंतवणूक विचारपूर्वक करावी.
 
■ नातीगोती हा आठवडा कौटुंबिक जीवनात चढ-उतार दाखवू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून वादाची स्थिती बनू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवणे गरजेचे आहे. जीवनसाथीसोबत वेळ घालवल्याने नात्यात सुधारणा होईल. प्रेमसंबंधात भावनिक गहिरेपणा वाढेल.
 
■ आरोग्य : या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे अणार आहे. मानसिक ताण व थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्यावी व आपली दिनचर्या संतुलित राखावी. पोट आणि झोपेसंबंधित समस्यांपासून सावध राहावे. योग व ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी उपयुक्त राहील.
 
■ शुभदिनांक : ०५, ०८,०९
 
■ शुभरंग हिरवा, पिवळा, नारंगी
 
■ शुभवार : रविवार, सोमवार, बुधवार
 
■ दक्षता : कोणावरही जास्त विसंबून राहू नका.
 
■ उपाय : या आठवड्यात सोमवारी शिवपूजा करावी. शिवलिंगावर दूध व पाणी वाहावे. ॐ नमः शिवाय मंत्राचा जप करावा. यामुळे मानसिक शांती व सकारात्मक ऊर्जा लाभेल.