हा आठवडा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील जातकांसाठी विशेष शुभ राहणार आहे. परंतु काही अनावश्यक खर्च तुमच्या आर्थिक स्थितीवर दबाव टाकू शकतात.त्यामुळे बजेट नियंत्रित ठेवणे गरजेचे असेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा काहीसा संथ जाणवल्यामुळे फायदा कमी हाेईल.
नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा करिअरमध्ये प्रगतीचे नवे संकेत देत आहे. तुमच्या प्रयत्न आणि परिश्रमाचे याेग्य फळ मिळेल. जर तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घेत असाल तर यश मिळण्याची प्रबळ श्नयता आहे. नाेकरदारांसाठी हा काळ विशेष अनुकूल हाेईल व कार्यस्थळावर तुमची प्रशंसा हाेईल.
नातीगाेती : या आठवड्यात काैटुंबिक जीवन संमिश्र स्वरुपाचे राहील.जवळच्या लाेकांकडून अपेक्षित मदत न मिळाल्यामुळे मन काहीसे खिन्न राहू शकते. तसेच कुटुंबीयांच्या तब्बेतीविषयीही चिंता राहू शकते. एखाद्या नातेवाईकाकडून तुम्हाला सुखद बातमी कळण्याची श्नयता आहे. ज्यामुळे मन प्रसन्न हाेईल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील पण तुम्ही खाण्या- पिण्याबाबत बेपर्वाई करू नये. पाेटासंबंधित समस्या सतावण्याची श्नयता आहे. मानसिक संतुलन राखण्यासाठी याेग व प्राणायामाचा आधार घ्या.दिनचर्या नियमित राखणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील.
शुभदिनांक : 05, 08, 09
शुभरंग : हिरवा, पिवळा, नारंगी
शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम करताना धैर्य व संयम टिकवून ठेवा.घाईमुळे नुकसान संभवते.
उपाय : या आठवड्यात शिव-उपासना करा. शिवलिंगावर पाणी वाहा व ॐ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.