कुंभ

    05-Apr-2026
Total Views |
 
 
 

aries 
हा आठवडा तुमच्यासाठी नवे विचार व याेजना साकारण्याचा काळ आहे.तुम्ही तुमच्या रचनात्मक दृष्टिकाेन व दूरदर्शीपणाच्या बळावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा हाेण्याचे संकेत मिळत आहेत पण त्यासाेबतच तुम्ही खर्चावर ताबा राखणेही गरजेचे आहे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरच्या क्षेत्रात प्रगतीच्या संधी येतील. कार्यस्थळावर तुमची प्रतिभा वा नवे विचार वाखाणले जातील. नव्या जबाबदाऱ्याही मिळू शकतात. ज्या भविष्यात लाभदायक ठरतील. व्यापाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. विशेषत: तंत्रज्ञान वा नव्या क्षेत्रात यश मिळू शकते..
 
 नातीगाेती : या आठवड्या तुमचे काैटुंबिक जीवन नेहमीपेक्षा चांगले राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळू शकते. त्यासाेबतच त्यांच्यासाेबतचे संबंधही मजबूत हाेतील. जीवनसाथीसाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.ज्यामुळे नात्यांत गाेडवा येईल. प्रेमसंबधातही सकारात्मकता राहील.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण तुम्ळी मानसिक तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. अधिक विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकताे. ध्यान आणि याेगाचा तुमच्या दिनचर्येत समावेश करावा.त्यासाेबतच स्क्रीन टाइम कमी करावा.
 
 शुभदिनांक : 06, 07, 11
 
 शुभरंग : पांढरा, क्रीम, गुलाबी
 
 शुभवार : साेमवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणताही निर्णय घाईगडीबडीत घेऊ नये.
 
 उपाय : या आठवड्यात शनिदेवाची पूजा करावी व गरीबांना काळे तीळ व काळी वस्त्रे दान करावीत.