मरळी (ता. पाटण) आयाेजित काेयना-दाैलत डाेंगरी महाेत्सवाच्या निमित्ताने डाेंगरी भागातील नागरिकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती मिळणार आहे.या निमित्ताने या परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांचाही अनुभव घेता येणार असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.काेयना-दाैलत डाेगरी महाेत्सवाचे उद्घाटन करताना देसाई बाेलत हाेते.यावेळी जिल्हाधिकारी संताेष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ.वैशाली कडुकर, पंचायत समिती सभापती सरिता पवार, उपसभापती विजय पवार, विजयादेवी देसाई, लाेकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्षयशराज देसाई, माेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, प्रांताधिकारी साेपान टाेणपे, तहसीलदार अनंत गुरव आदी यावेळी उपस्थित हाेते.हा महाेत्सव 6 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या महाेत्सवात शस्त्रप्रदर्शन, लावणी महाेत्सव, पाेवाडा सादरीकरण, मर्दानी खेळ, भजन कीर्तन, ब्रास बँडपथक, हिंदी व मराठी संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले. उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांनी शाैर्यगीते व मर्दानी खेळांचे सादरीकरण केले. त्याला उपस्थितांचा माेठा प्रतिसाद मिळाला.