हा आठवडा तुमच्यासाठी हुशारीचा, व्यवस्थेचा परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा व त्यात याेग्य सुधारणा करण्याचा राहणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जुन्या कामांची समीक्षा करायला हवी. त्यानुसार तुमच्या भावी याेजना आखायला हव्यात.याचा तुम्हाला भविष्यात फायदा हाेईल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरबाबतचा काळ मेहनत आणि शिस्तीचा असेल. कार्यस्थळावर तुमची कार्यशैली व बारकाईने काम करण्याची सवय तुमची वेगळीच ओळख निर्माण करील. व्यापार करणाऱ्या जातकांनी नियाेजनपूर्वक काम केल्यास फायदा हाेईल..
नातीगाेती : हा आठवडा नात्यांमध्ये संतुलन राखण्याचा असणार आहे.कुटुंबातील सर्वांचे सहकार्य लाभेल. अपरिचित लाेकांशी मैत्री करताना सावध राहावे. तुमच्या जाेडीदाराच्या निर्णयांमध्ये. जाेडीदाराची एखादी गाेष्ट खटकत असेल तर प्रेमाने समजावून सांगावी. प्रेमसंबंधात स्थिरता येईल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण तुम्हाला पचनाच्या आणि त्वचेच्या समस्या सतावू शकतात. उष्माघातासाेबतच घामाेळ्या येण्याचीही श्नयता आहे. या दिवसांत श्नयताे तेलकट तिखट व जड पदार्थ खाणे टाळायला हवे. ताज्या पालेभाज्या खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
शुभदिनांक : 29, 30, 02
शुभरंग : निळा, जांभळा, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात क्षुल्लक गाेष्टींची जास्त चिंता करू नये. इतरांच्या चुकांविषयी जास्त कठाेर हाेऊ नये.
उपाय : बुधवारी हिरव्या भाज्या वा हिरवे मूगडाळ दान करावेत..श्री विष्णू वा श्रीगणेशाची पूजा करावी. घरात स्वच्छता राखावी.