हा आठवडा तुमच्यात दडलेली शक्ती व दृढता समाेर आणणारा असणार आहे. तुम्ही तुूच्या लक्ष्यांबाबत अधिक गंभीर व केंद्रित राहाल. काही परिस्थिती तुम्हाला मानसिक आव्हान देतील पण तुम्ही हुशारीने त्यांना सामाेरे जाल. हा काळ आत्मविश्लेषणाचाही आहे.
नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा करियर व व्यवसायासाठी मेहनत व रणनीती ठरवण्याचा राहील. कार्यस्थळावर काही कठण परिस्थितींचाही सामना करावा लागू शकताे. पण तुम्ही हुशारीने व धैर्याने पुढे जाल. व्यापार करणाऱ्यांसाठी या आठवड्यात विचारपूर्वक गुंतवणूक करायला हवी.
नातीगाेती : नात्यांबाबत हा आठवडा थाेडा संवेदनशील राहू शकताे. तुमच्या खाेल भावना आणि तीव्र स्वभाव कधी कधी गैरसमज निर्माण करू शकता.तुम्ही तुमचे विचार शांतपणे व स्पष्ट व्यक्त करायला हवेत. जीवनसाथीशी माेकळेपणाने बाेलल्यास संबंध मजबूत हाेतील.
आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. पण मानसिक तणाव व जास्त विचार करणे टाळायला हवे. शरीरात थकवा वा ऊर्जेची कमतरता जाणवू लागेल. नियमित व्यायाम, ध्यान व पुरेसा आराम घेतल्यास तुम्हाला फायदा हाेईल. स्क्रीनवर जास्त वेळ वाया घालवू नये.
शुभदिनांक : 26, 01, 01
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : या आठवड्यात काेणताही निर्णय घाईत वा आवेशात घेऊ नये.आपली गुपिते इतरांशी शेअर करू नयेत.
उपाय : मंगळवारी हनुमानाला शेंदूर व चमेलीचे तेल अर्पण करावे. नियमितपणे हनुमानचालिसा वाचावी.