नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील लाॅजिस्टिक्स हबच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू हाेण्यासाठी सिडकाेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एकात्मिक लाॅजिस्टिक्स पार्क उभारणीसाठी प्राथमिक टप्प्यात स्वारस्य अभिव्य्नती आमंत्रित केली आहे. जवाहरलाल नेहरू पाेर्ट, नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारख्या प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या दळणवळणाचा लाभ घेत हा प्रकल्प शहराच्या आर्थिक वाढीस चालना देणार आहे.अधिकृतरित्या उभारल्या जाणाऱ्या या लाॅजिस्टिक्स हबमुळे शेकडाे अनधिकृत गाेदामांना आळा बसणार आहे. सिडकाेतर्फे पुष्पक नाेडमधील चिर्ले गावाजवळ सुमारे 374 हेक्टर क्षेत्रावर भव्य एकात्मिक लाॅजिस्टिक्स पार्क विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात आवश्यक पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा आणि उपयु्नतता जाळ्यांचा समावेश असेल. सविस्तर आराखड्यानुसार हे संपूर्ण क्षेत्र सात लाॅजिस्टिक्स झाेनमध्ये विभागण्यात आले असून, 45 मीटर व 30 मीटर रुंदीच्या रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे.
प्राथमिक टप्प्यात सुमारे 72 हेक्टर क्षेत्रातील 12 भूखंडांसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे गुंतवणूकदारांना संधी देण्यात आली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांसारख्या मूलभूत सुविधा सिडकाे विकसित करणार आहे. निवड झालेल्या अर्जदारांशी सामंजस्य करार करून भूखंड वाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र लाॅजिस्टिक्स धाेरणानुसार या प्रकल्पात वेअरहाउसिंग, कंटेनर फ्रेट स्टेशन, इनलँड कंटेनर डेपाे आणि लाइट इंडस्ट्रीजसारख्या सुविधा उभारल्या जाणार आहेत.एकात्मिक लाॅजिस्टिक्स पार्कच्या विकासाद्वारे, सिडकाे कार्यक्षम मालवाहतूक सुलभ करणारी, गुंतवणूक आकर्षित करणारी आणि आर्थिक विकासाला चालना देणारी भविष्याभिमुख परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.नवी मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील लाॅजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे सिडकाेचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले.