'तूळ'

    26-Apr-2026
Total Views |
 
 

horoscope 
 
हा आठवडा तुमच्या जीवनात संतुलन व समजुतदारपणाची परीक्षा घेणारा राहणार आहे. तुम्ही अनेक महत्त्वाच्या निर्णयांसमाेर असाल. जिथे चूक व बराेबरमध्ये निवड करणे साेपे असणार नाही. अशावेळी घैर्य व विवेकाने काम करणे तुमच्यासाठी सर्वांत चांगले असणार आहे.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात विचारपूर्वक पावले उचलायला हवीत. कार्यस्थळावर तुमच्या कामाची प्रशंसा हाेऊ शकते पण त्यासाेबत स्पर्धाही वाढेल. तुम्ही तुमची क्षमता सिद्ध करू शकता. व्यापाऱ्यांनी माेठी गुंतणवूक करण्यापूर्वी अनुभवींचा सल्ला घ्यावा.
 
 नातीगाेती : नात्यांबाबत हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा राहील. कुटुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे मानसिक शांती लाभेल. तुम्ही संभाषणाला नाते सुधारण्याचे माध्यम बनवा. प्रमसंबधांत उत्तम संवादामुळे या आठवड्यात मजबूती येईल व तुमचा प्रेमी खूश राहील.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य सामान्य राहील. पण मानसिक ताण व गाेधळाची स्थिती तुमच्या मनावर परिणाम करू शकते. पुरेशी झाेप व नियमित दिनचर्या गरजेची असेल. याेग व ध्यान तुमच्यासाठी उपयुक्त असेल. ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर नियमितपणे ब्लडप्रेशर तपासत राहावे.
 
 शुभदिनांक : 29, 30, 02
 
 शुभरंग : निळा, जांभळा, काळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणत्याही निर्णयात घाई करू नये. इतरांचे ऐकून काेणताही निर्णय घेऊ नये.
 
 उपाय : या आठवड्यात शुक्रवारी लक्ष्मीमातेला शुभ्र मिठाई अर्पण करावी व सुगंधी फूल वाहावे.