हा आठवडा तुमच्या व्यक्तिमत्वाचे तेज व प्रभाव अधिक उजळ करणारा असेल. तुम्ही तुमच्या निर्णयात ठामपणा दाखाल व अनेक स्थितीत नेतृत्व करताना दिसून याल. आत्मविश्वास वाढेल, पण यात संतुलित राखणे आवश्यक असेल.वेळेचा याेग्य उपयाेग केल्याने माेठे यश मिळवू शकाल.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्यासाठी करियर व व्यवसायासाठी सक्रियता व प्रदर्शनाचा राहील. कार्यस्थळावर तुमची मेहनत व नेतृत्वक्षमतेची प्रशंसा राहील. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी विस्ताराच्या संधी मिळू शकतात पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही नात्यांबाबत थाेडे संवेदनशील राहू शकता. तुमचा स्पष्ट व प्रभावी स्वभाव कधी कधी इतरांना कठाेर वाटू शकता यासाठी शब्द व आचरणात थाेडी नरमाई ठेवा. कुटुंबासाेबत वेळ घालवल्यामुळे संबंधात संतुलन राहील. प्रेमात सचाेटी व हुशारी हवी.
आराेग्य : आराेग्याच्या दृष्टिकाेनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. पण हृदय आणि रक्तदाबासंबंधित समसया असणाऱ्या जातकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्यावर लक्ष द्यायला हवे. त्याचा तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम हाेईल.
शुभदिनांक : 26, 01, 01
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
दक्षता : तुम्ही तुमच्या अहंकाराने वा हटवादीपणाने काेणताही निर्णय न घेता इतरांच्या भावनांचाही विचार करावा.
उपाय : रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावा व आदित्य स्ताेत्राचे वाचन करावे.गरजूंना गहू व गूळ द्यावा.