कुंभमेळ्यासाठी एआयच्या व्यापक वापराचा निर्णय

    26-Apr-2026
Total Views |
 

kumbh 
 
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे हाेणारा सिंहस्थ कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) व्यापक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने नुकतीच उच्चस्तरीय कार्यशाळा झाली.या बैठकीत राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पाेलीस अधिकारी; तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी एकत्र आले हाेते.या कार्यशाळेत मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार काैस्तुभ धवसे, नाशिक विभागीय आयु्नत प्रवीण गेडाम, आयजी राजेश प्रधान, कुंभमेळा आयु्नत शेखर सिंह, डीआयजी (वायरलेस) जी. श्रीधर, एसपी (वायरलेस) राजा रामास्वामी, नाशिक महापालिकेचे अतिर्नित आयु्नत अमित रंजन आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिर्नित आयु्नत कमलाकर रणदिवे आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले हाेते.
 
मेटा, गुगल, मायक्राेसाॅफ्ट, एमआयटी मीडिया लॅब, भाषिनी, साेकेट एआय, अद्या. एआय यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या आणि संस्थांचे तज्ज्ञही या चर्चे त सहभागी झाले.कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आराेग्य सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद यासाठी एआयचा नेमका कसा उपयाेग हाेऊ शकताे, यावर यात सखाेल चर्चा झाली. कुंभमेळा प्राधिकरणाने कुंभ एआय स्टॅक ही संकल्पना मांडली असून, हजाराे सीसीटीव्ही कॅमेरे, ड्राेन, सेन्सर्स आणि माेबाइल नेटवर्कमधील माहितीचे विश्लेषण करून तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता या प्रणालीत असेल. त्यामुळे गर्दी वाढण्यापूर्वीच तिचा अंदाज घेऊन उपाययाेजना करणे शक्य हाेणार आहे.
 
नाशिक शहरात सध्या सुमारे 1300 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, त्यात आणखी 4000 कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. यासाेबतच स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम, पार्किंग व्यवस्था आणि पर्यावरणीय सेन्सर्स यांसारख्या पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध आहेत. कुंभमेळ्यासाठी या सर्व यंत्रणांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.भाविकांसाठी कुंभदूत हा एआय आधारित डिजिटल सहायक विकसित करण्यात येत असून, साध्या माेबाइल फाेनपासून स्मार्टफाेनपर्यंत सर्वांसाठी ताे उपलब्ध असेल.व्हाॅट्सअ‍ॅप, आयव्हीआर, माेबाइल अ‍ॅप आणि सार्वजनिक घाेषणांद्वारे भाविकांना मार्गदर्शन मिळणार आहे. ेकुंभमेळ्याचे व्यवस्थापन प्रतिक्रिया-आधारित (रिअँक्टिव) न राहता भविष्यवेधी (प्रेडिक्टिव) करण्यावर भर देण्यात येत आहे.संभाव्य गर्दी, स्वच्छता आणि आराेग्याशी संबंधित अडचणी आधीच ओळखून उपाययाेजना करण्याची क्षमता एआय प्रणालीत असेल.