उन्हाळ्यात त्वचेचा तजेला टिकवण्यासाठी हे बदल करा!

    26-Apr-2026
Total Views |
 

Health 
 
माॅर्निंग रुटीन : सकाळी उठून माईल्ड फेस वाॅशने चेहरा स्वच्छ करावा, ज्यामुळे रात्रभर चेहऱ्यावर जमा झालेले सिबम म्हणजेच तेल दूर हाेते. जर शक्य असेल तर व्हिटॅमिन सी सिरम लावा. ते उन्हामुळे हाेणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचे संरक्षण करते. घराबाहेर पडण्याच्या 20 मिनिटांपूर्वी एसपीएफ 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन लावा. वातावरण ढगाळ असले तरीही सनस्क्रीन लावणे टाळू नका.
 
केवळ क्रीमवर अवलंबून न राहता, उन्हात बाहेर पडताना त्वचा सुती रुमालाने किंवा दुपट्ट्याने व्यवस्थित झाकून घ्या. डाेळ्यांखालील नाजूक त्वचेसाठी सनग्लास वापरा आणि डाेक्यावर कॅप किंवा छत्रीचा वापर करा. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात राहत असाल, तर दर 3 तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे.
 
उन्हातून आल्यावर लगेचच चेहरा धुवू नका.उन्हातून आल्यावर किमान 5-10 मिनिटे थांबा.त्यानंतरच थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
ताजेतवाने वाटण्यासाठी तुम्ही गुलाबजलचा स्प्रे देखील करू शकता. उन्हामुळे त्वचेची जळजळ हाेत असल्यास काेरफड जेल लावा. यामुळे त्वचा शांत हाेते आणि हीलिंग प्रक्रिया वेगवान हाेते.
 
रात्री हलक्या स्क्रबनं त्वचा एक्सफाॅलिएट करा.यामुळे टॅनिंगमुळे जमा झालेली मृत त्वचा निघून जाईल. रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती करत असते.त्यामुळे नियासिनमाइड किंवा लॅक्टिक अ‍ॅसिड असलेले माॅइश्चरायझर किंवा नाईट क्रीम लावा, हे टॅनिंग कमी करण्यास मदत करते.
 
घरगुती उपाय :
 
दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड स्किनला लाईट बनवते. दाेन चमचे दह्यात थाेडे बेसन आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटे लावून ठेवा. हे केवळ टॅनिंगच घालवत नाही तर त्वचेला मऊ देखील बनवते.
 
टाेमॅटाेमध्ये लाईकाेपीन असते, जे नैसर्गिक सनस्क्रीनसारखे काम करते. टाेमॅटाेचा गर चेहऱ्यावर हलक्या हाताने घासावा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि टॅनिंग कमी हाेते.
 
जर तुम्हाला चेहऱ्यावर काळे डाग किंवा जास्त टॅनिंग असेल, तर बटाट्याचा रस सर्वाेत्तम आहे. बटाट्यामध्ये नैसर्गिकरीत्या त्वचेला ब्लीच करण्याची क्षमता असते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि डागविरहित हाेते.