महाराष्ट्र हे देशाचे ग्राेथ इंजिन असून, परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे.राज्य शासनाच्या उद्याेगस्नेही धाेरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी महाराष्ट्र ‘ग्लाेबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून उदयास येत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला.भारतातील डेन्मार्कचे राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांनी मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी, फर्स्ट सेक्रेटरी (ट्रेड पाॅलिसी अँड इकाॅनाॅमिकअफेअर्स) मॅथियास एमिल बेंग्टसन; तसेच मानद डेन्मार्क वाणिज्य दूतावास, मुंबईचे उपमहावाणिज्यदूत कन्नन नटराजन उपस्थित हाेते. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी, बंदर विकास, शिपिंग, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवर चर्चा करण्यात आली.
डेन्मार्कने त्यांच्या किनारी भागात आणि अल्प अंतराच्या फेरी सेवांमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरले असून, अशा तंत्रज्ञानाचा मुंबई काेकण किनारपट्टीसाठीही माेठा उपयाेग हाेऊ शकताे, असे डेन्मार्कचे राजदूत क्रिस्टेन्सेन यांनी सांगितले. डेन्मार्कच्या सुमारे 60 कंपन्या मुंबई व पुणे परिसरात उत्पादन, रिटेल, सेवा, शिपिंग आदी क्षेत्रांत कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत-डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत विशेषतः सागरी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य महत्त्वाचा भागीदार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्य्नत केला.