मित्रा आणि बायसॅग-एनमधील करारामुळे तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळेल

    26-Apr-2026
Total Views |
 
 

CM 
 
राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय याेजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्रा’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या करारामुळे राज्याच्या सर्वांगीण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला. वर्षा निवासस्थानी मित्रा (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फाॅर ट्रान्सफाॅर्मेशन) आणि बीयसॅग-एन (भास्काराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फाॅर स्पेस प्लिकेशन अँड जिओ-इन्फाॅमेटिक्स) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
 
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लाेकेश चंद्रा, मुख्यमंत्रीकार्यालयाचे प्रधान सचिव डाॅ.श्रीकर परदेशी, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बायसॅग-एनचे महासंचालक डाॅ. टी. पी. सिंह, ‘मित्रा’चे वरिष्ठ सल्लागार डाॅ. विराज लाेलियाना, संशाेधन अधिकारी सुमेरन बालसेकर व अधिकारी उपस्थित हाेते. भूस्थानिक माहितीचे व्यवस्थापन व विश्लेषणासाठी विविध स्राेतांमधून आणि विविध स्वरूपांतील माहिती संकलित करून तिचे सखाेल निरीक्षण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे शासकीय याेजना, विविध प्रकल्प आणि कार्यक्रमांचे संनियंत्रण व मूल्यमापन प्रभावीपणे करता येईल; तसेच वस्तुनिष्ठ व सखाेल विश्लेषणाच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक समताेल राखत शासकीय याेजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत हाेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केला.